Ad will apear here
Next
‘पीसीईआरएफ’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : बांधकाम क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘पीसीईआरएफ-कुमार बेहरे कन्स्ट्रक्शन सेफ्टी अॅवॉर्ड २०२०’ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ‘पीसीईआरएफ’ अर्थात पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०१९ पर्यंत आहे.

बांधकाम क्षेत्रात सुरक्षा योजना वाढाव्यात व त्याला प्रोत्साहन मिळावे. बांधकाम क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सुदृढ स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च फाउंडेशनने हा सुरक्षा पुरस्कार सुरू केला आहे. पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. विकसक, कंत्राटदार, बांधकाम संस्था व कंपन्याही या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. या क्षेत्रातील सुरक्षा अधिकारी, अभियंते, वास्तूविशारद आदि तज्ज्ञ व्यावसायिकांचा पुरस्कारासाठीच्या निवड प्रक्रियेत सहभाग असतो. हे तज्ज्ञ स्वेच्छेने या पडताळणी प्रक्रियेसाठी वेळ देतात.

या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी संस्थांना बांधकामाच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले जाते. यानंतर दोन टप्प्यांमध्ये पाहणी केली जाते. त्यात एकदा पूर्वकल्पना न देता पाहणी केली जाते. केवळ उत्तम बांधकाम साईटला पुरस्कृत करणे इतकेच या पुरस्काराचे उद्दिष्ट नसून, बांधकाम क्षेत्रातील दर्जेदार निर्मितीमूल्यांना प्रोत्साहन देणे व गरज भासेल तिथे सुधारणा सुचवणे, हा त्याचा हेतू आहे.

या पुरस्कारासाठी रहिवासी, औद्योगिक, व्यावसायिक / उपव्यावसायिक प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प, नव्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कंपन्यांच्या बांधकाम साईट्स, बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेसंदर्भातील नवकल्पना आणि प्रकल्प खर्च ५० लाखांपर्यंत असलेले लहान प्रकल्प असे सात विभाग करण्यात आले आहेत. या विभागांतर्गत इच्छुकांनी अर्ज पाठवायचे आहेत.

अधिक माहितीसाठी :  (०२०) २५४४७३६५, ९८२३५ ०८५७६                     
                                 pcerfpune@gmail.com  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZJNCB
Similar Posts
महिला कामगार करणार गवंडीकामही; प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास पुणे : इमारत बांधकामाच्या ठिकाणी महिला प्रामुख्याने दिसतात त्या ओझी वाहण्याचे काम करताना; पण पुण्यातील काही इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आता महिला कामगार गवंडीकाम करतानाही दिसणार आहेत. ‘क्रेडाई’तर्फे काही महिलांना त्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, कौशल्यवृद्धीमुळे या कामगारांना कामाचा अधिक मोबदला मिळणार आहे
‘बीओसीडब्ल्यू’ तर्फे बांधकाम कामगारांना १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत पुणे : ‘‘बीओसीडब्ल्यू’ अर्थात ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत पुण्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आतापर्यंत १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत करण्यात आले असून, ३४ हजार कामगारांना त्याचा फायदा मिळाला आहे,’ अशी माहिती कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली.
व्ही. जी. जाना यांना सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार पुणे : अभियांत्रिकी व बांधकाम उद्योगातील ५५ वर्षांहून अधिक काळाच्या बहुमोल व महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी, व्ही. जी. जाना यांना कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (सीआयडीसी) राष्ट्रीय पातळीवरील ‘सीआयडीसी विश्वकर्मा
‘आयसीएआय’ पुणे शाखेची चार पारितोषिकांवर मोहर पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेला २०१८ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर दोन, तर विभागीय पातळीवर दोन असे चार पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर ‘आयसीएआय पुणे’ला दुसरी सर्वोत्तम शाखा आणि सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language